बीड : नगरपरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित असल्याने आता नव्या महिला नेतृत्वाला संधी मिळणार आहे. ज्यांना पूर्वी संधी मिळाली नाही, त्यांचाही विचार केला जाईल. तसेच, ५० टक्के प्रतिनिधित्व तरुणांना दिले जाईल. गेली ३० वर्ष बीडकरांनी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. ही विजयाची परंपरा पुढेही कायम राहणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बीडमध्ये सौ.के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (दि.१६) बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ.सारिकाताई क्षीरसागर, माजी नगरसेवक किशोर काळे, गणेश वाघमारे, भास्कर जाधव, नरसिंग नाईकवाडे, शिवाजी जाधव, संजय होळकर, शुभम धूत, अशोक वाघमारे, विकास जोगदंड, प्रकाश कानगावकर, प्रेम चांदणे, रवी जवेरी, राहुल गुरखुदे, बाळासाहेब जाधव, सुभाष सपकाळ, संगीता वाघमारे, शालिनी परदेशी, मुस्तफा भाई, नशीर अन्सारी, बाळासाहेब आंबेकर, महेश गर्जे, अमोल पवळ, साउद भाई, सतीश पवार, नबील जमा, बाळासाहेब गुंजाळ, दत्ता जाधव, संभाजी दुधाळ, रवींद्र कदम, जुनेद जहागिरदार, अशोक शेजवळ, बाबू अत्तार, मुजीब एवन, गुड्डू चाऊस, बिलाल, असरार, पिंटू माने, खमर, द्वारकादास फटाले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



