उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजतात आठवडी बाजार असतानाही चौसाळा शहर कडकडीत बंद
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली अर्पण
चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समजताच चौसाळा शहरात शोककळा पसरली. ही बातमी कळताच चौसाळा येथील आठवडी बाजार सुरू असतानाही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून संपूर्ण चौसाळा शहर कडकडीत बंद पाळला. नेहमी गजबजलेला आठवडी बाजार आज पूर्णपणे शांत दिसून आला. नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत दादांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, चौसाळा येथील बस स्थानक परिसरात सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि चौसाळा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन याठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी “अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर है” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दादांच्या निधनाने चौसाळा परिसर तसेच स्थानिक जनतेमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -