एकाच प्रभागात दोघांना एबी फॉर्म! उमेदवाराने डोक लावलं अन् दुसऱ्याचा फॉर्मच खाऊन टाकला; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : नव महाराष्ट्र न्यूज
पुण्यात पालिका निडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गटा) मध्ये अंतर्गत वाद उफाळल्याचे पहायला मिळाले. बुधवारी सकाळी प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये उमेदवारीवरून राजकीय रणधुमाळी चिघळली असून पक्षाकडून देण्यात आलेला AB फॉर्म शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क खाऊनच टाकला. उद्धव कांबळे यांनी पक्षाने दिलेला AB फॉर्म मच्छिंद्र ढवळे यांचा AB फॉर्म हिसकावून घेऊन खाऊन टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच प्रभागात दोन उमेदवारांना AB फॉर्म दिल्याने मच्छिंद्र ढवळे यांचा AB फॉर्म हिसकावला आणि तो फाडून गिळून टाकला. कांबळेंच्या या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठा धोक्यात आली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि उद्धव कांबळेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेआहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -