कानडी घाट हायस्कूलच्या रमेश जाडकर सरांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या समन्वयातून शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या विभाग स्तरीय स्पर्धेत एकूण विविध ४२ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन या वर्षात केलेले आहे. राज्यातील शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी यातीलच ॲनिमेशन सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी १८ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रत्येक तालुक्यातून प्रथम आलेल्या स्पर्धकांची विभागीय स्तरीय ॲनिमेशन सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. यात स्पर्धेत नवगण शिक्षण संस्था, बीड च्या कानडी घाट हायस्कूल कानडी घाट ता. जि. बीड या शाळेचे गणित विषय शिक्षक रमेश जाडकर सरांची विभागीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करत क्रमांक पटकाविला.
जानेवारी महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या या कामगिरी करिता नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर तसेच संस्थेचे प्रशासक डॉ. व्हि. टी. देशमाने, डॉ. श्री गुट्टे तसेच कानडी घाट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री एम.एन. कसबे सर, चौसाळा बीटच्या जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती प्रणिता गंगाखेडकर, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच जानेवारीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -