Wednesday, February 25, 2026
spot_img

खंडोबाच्या दैवी तेजात उजळणार चंपाषष्ठी — बीड खंडोबा दिपमाळ मंदिराची ऐतिहासिक यात्रा

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

बीड जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबा दिपमाळ मंदिरात चंपाषष्ठी निमित्त २५ ते २६ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसीय भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धाळूंच्या असंख्य आस्थास्थान असलेले हे देवस्थान आपल्या १७व्या शतकातील हेमाडपंथी दगडी बांधकाम, उंच दीपमाळ, तसेच प्राचीन परंपरांसाठी विशेष ओळखले जाते.

मंदिर परिसरातील दोन सुमारे ७० फूट उंच दीपस्तंभ हे या ठिकाणचे प्रमुख वैशिष्ट्य असून, यात्रेच्या काळात त्यावरील दीपप्रज्वलन हा भक्तांसाठी आध्यात्मिक आनंदाचा सोहळा ठरतो. गाभाऱ्यातील मार्तंड-भैरव स्वरूपातील खंडोबा हे शौर्य, संरक्षण व धर्मसंस्थापनेचे प्रतीक मानले जाते.

चंपाषष्ठी हा दिवस मल्ल–मणी राक्षसांचा संहार करून धर्मरक्षण केल्याच्या ऐतिहासिक पौराणिक स्मृतीशी जोडलेला आहे. त्यामुळे या दिवशी अभिषेक, दिपदान, काठीपूजन, पालखी सोहळा, जागरण-गोंधळ आणि रथप्रदक्षिणा अशा पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते.

या यात्रेनिमित्त मंदिर संस्थानतर्फे
– विशेष महापूजा व अभिषेक,
– भजन-कीर्तन व जागरण-गोंधळ,
– भव्य पालखी व रथप्रदक्षिणा,
– तसेच महाप्रसाद, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, स्वच्छता उपक्रम
यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिव्य उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून “यल्ला मल्लारी, जय खंडोबा” जयघोषात दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री खंडोबा देवस्थान संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

“श्री खंडोबा दीपमाळ मंदिर संस्थानतर्फे भक्तांच्या सोयीसाठी आणि या पवित्र ऐतिहासिक मंदिराच्या जतनासाठी अनेक विकासकामे सुरू केली आहेत. संपूर्ण विकास आराखडा तयार असून अल्प पूर्तता बाकी आहे; ती पूर्ण झाली तर मंदिराचा विकास वेगाने पुढे जाईल. मात्र पुरातत्व विभागाच्या अडमुठ्या भूमिकेमुळे आणि स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शतकानुशतकांच्या परंपरेचे हे देवस्थान अनावश्यक अडथळ्यांना सामोरे जात आहे. देवस्थानाचा विकास हा कोणाच्याही अहंकाराचा बळी ठरू नये—यासाठी आम्ही अपेक्षित सहकार्याची तीव्र मागणी करतो.”
— रामनाथ खोड, (कोषाध्यक्ष, श्री खंडोबा दीपमाळ मंदिर संस्थान, बीड)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles