गुरुदत्त माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
बीड : नव महाराष्ट्र न्यूज
बीड तालुक्यातील चौसाळा येथील गुरुदत्त माध्यमिक विद्यालयात ‘संविधान दिन’ 26 नोव्हेंबर बुधवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान दिनानिमित्त आयोजित केलेली वक्तृत्व स्पर्धा झाली या वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना गुरु महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबुराव जोगदंड यांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका सौ. श्रीमती साबणे मॅडम यांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. स्वतंत्र, समानता, बंधुता व न्याय हे संविधानाचे अधिकार भारतीय संविधानांनी आपल्या भारतीय नागरिकांना दिले आहेत. तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री केदार सर यांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सरांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात संविधानामधील मूलभूत अधिकार व देशाप्रती नागरिकांचे कर्तव्य यावरती प्रकाश टाकला. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. आधी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घोडके सर यांनी केले तर प्रास्ताविक जयवंत मोटे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री लिमकर सर, श्री गुरव सर, श्री पवार सर, श्री बाळासाहेब जाधव, टाचतोडे बाई, नाना सोनवणे, विश्वनाथ पवार, धनंजय वाघमारे, पवार बाई यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकेत कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार शाळेतील शिक्षक श्री होंडे सर यांनी मानले. तसेच या कार्यक्रमाचा पसायदानाने समारोप झाला.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -