Monday, March 2, 2026
spot_img

गुरूदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चौसाळा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चौसाळा ता. जि. बीड या शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुरवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर होते.

शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद या महापुरुषांच्या जीवनावर व कर्तृत्वार आधारित मोठ्या उत्साहात भाषणे केली. शाळेतील सातवी मधील विधाथि॔नीं कु. गुरव कल्याणी सुंदर हिने मी जिजाऊ बोलतेय हि एकांकिका श्रीमती साबणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री घोडके सर, मोटे सर, श्रीमती साबणे मॅडम, जाधव मॅडम, गुरव सर, लिमकर सर यांनीही या महापुरुषांच्या जीवनावर आधारित विद्यार्थींना माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना स्वामी विवेकानंदांना किती कुशाग्र बुद्धी होती. हे वाचनालयातील प्रसंगावरून व शिकागो येथील धर्म परिषदेत विवेकानंदांनी केलेल्या भाषणातुन माझा हिंदु धर्म कसा सर्व श्रेष्ठ आहे हे जगाला पटवून दिले.

तसेच राजमाता जिजाऊ यांच्या विषयी माहिती देताना जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर लहान वयातच स्वराज्या विषयी योग्य ते संस्कार करून अन्याय, अत्याचार विषयी चिड निर्माण केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श स्वराज्याची स्थापना करून सर्वांना भयमुक्त केले.

कार्यक्रमाचा शेवट पसायदान व जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मोटे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील कर्मचारी श्री बाळासाहेब जाधव, श्रीमती टाचतोडे बाई, धनंजय वाघमारे, विनायक तांदळे, इंद्रजित भोसले विश्वनाथ पवार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles