Monday, March 2, 2026
spot_img

चौसाळा परिसरातील हिंगणी (बुद्रूक) येथील गायरान जमिनी वरील टोरेन्ट पावर पवनचक्की कंपनीची दादागिरी थांबवा – विवेक कुचेकर

महसूल विभाग आणि वन विभागाचे जाणीपूर्वक दुर्लक्ष

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

बीड तालुक्यातील हिंगणी (बुद्रूक) शिवारातील गायरान जमिनीत पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दादागिरी करत याठिकाणी अनाधिकृत विधुत पोल रोवले असुन सदरील कंपनीच्या गुत्तेदाराची दादागिरी तात्काळ थांबवावी अन्यथा बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, हिंगणी (बुद्रूक) शिवारातील गायरान जमिन ही गेल्या चाळीस वर्षापासून चौसाळा येथील भूमिहीन लोक ही गायरान जमीन कसत आहेत. या ठिकाणी टोरेन्टो पावर नावाच्या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दादागिरी करत या ठिकाणी विद्युत वाहिनेचे पोल अनाधिकृत रित्या उभे केलेले आहेत. सदरील पोल हे कुठल्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता अनधिकृतपणे उभे केलेले आहेत. गायरान जमिनीलगतच असणाऱ्या नंबर बांध रस्ता देखील या अधिकाऱ्यांनी हे पोल रोवून बंद केलेला आहे. याबाबतीत कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तरे देत हे विद्युत वाहिनीचे पोल उभे करण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

गेल्या 40 वर्षापासुन कसत असणाऱ्या गायरान जमीन धारकांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता या गायरानधारकांसोबत दादागिरी करत सदरील गुत्तेदार हा हे पोल अनाधिकृत पणे रोवत असुन हा गायरान धारकांवरती केलेला एक प्रकारे अन्याय आहे सदरील टोरेंटो पावर नावाच्या पवनचक्की कंपनीच्या विद्युत वाहिनीचे पोलचे काम तात्काळ थांबविण्यात यावे व सदरील कामाची योग्य चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा चौसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles