Sunday, March 1, 2026
spot_img

चौसाळा परिसरातील हिंगणी (बु.) गायरान जमिनी वरील टोरेन्ट पावर पवनचक्की कंपनीच्या कामाचे जिल्हाधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश ; सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांच्या निवेदनाची घेतली दखल

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील हिंगणी (बु.) गायरान जमिनीत टोरेन्ट पावर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दादागिरी करत या ठिकाणी अनाधिकृत विधुत वाहीनीचे पोल रोवले असुन याविरुध्द सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी बीड जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देवुन तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेवुन बीड जिल्हाधिकारी व बीड तहसीलदार यांनी सदरील पवनचक्की कंपनीच्या कामाचे चौकशीचे आदेश देवुन कायदेशीर कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहीती अशी की, बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील हिंगणी (बु.) शिवारातील गायरान जमिन ही गेल्या चाळीस वर्षापासून चौसाळा येथील भुमीहीन लोक ही गायरान जमिन कसत असुन या ठिकाणी टोरेन्टो पावर नावाच्या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दादागिरी करत याठिकाणी विधुत वाहिनी चे पोल उभे केलेले आहेत. सदरील पोल हे कुठल्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता अनाधिकृतपणे उभे केलेले आहेत.

तसेच गायरान जमिनीलगतच असणाऱ्या नंबर बांध रस्ता देखील या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हे पोल रोवुन बंद केलेला आहे. याबाबतीत सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी बीड जिल्हाधिकारी व बीड तहसीलदार यांना लेखी निवेदन देवून चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. या संदर्भात बीड जिल्हाधिकारी व बीड तहसीलदार यांनी चौकशी करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. आता पुढे या टोरेन्ट पावर पवनचक्की कंपनी वरती कुठली कायदेशीर कारवाई होती ते पाहणे गरजेचे असुन गोरगरीब गायरान धारकांना प्रशासन कसा न्याय देतय हे देखील पाहणे महत्वाचे आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles