बीड तालुक्यातील चौसाळा येथे आठवडी बाजारात गोमास विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नेकनूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत हजारो किलो गोमास जप्त केले आहे. ही कारवाई चौसाळा येथील आठवडी बाजाराच्या दिवशी करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौसाळा येथे आठवडी बाजाराच्या निमित्ताने गोमासाची बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती नेकनूर पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून चौसाळा येथे छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात गोमास आढळून आल्याने पोलिसांनी हजारो किलो गोमास जप्त केले.
ही कारवाई नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री आहेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार श्री जायभाय, पोलीस हवालदार श्री क्षीरसागर, श्री विद्वान यांच्यासह चौसाळा चौकीचे ठाणे अमलदार श्री मुरुमकर, पोलीस हवालदार श्री पुंडे, पोलीस नाईक श्री घुले यांचा सहभाग होता.
जप्त केलेल्या गौमासाबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नेकनूर पोलिसांनी दिला आहे.