Monday, March 2, 2026
spot_img

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत चौसाळा येथील जिल्हा परिषद शाळेचे यश

चौसाळा दि.१७ (प्रतिनिधी) : बीड जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या क्रीडा स्पर्धेत चौसाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील विद्यार्थी अफसर अब्दुल अन्सारी या विद्यार्थ्याने सहाशे मीटर धावणे १४ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता त्याची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
तसेच त्याने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ६०० मीटर धावणे १४ वर्षे वयो गटात ही प्रथम क्रमांक मिळवला होता. तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा या शाळेचे इतर विद्यार्थी यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावणे १४ वर्ष वयोगटात सिद्धेश्वर भागवत कोकणे याने द्वितीय क्रमांक मिळवला तर १०० बाय ४०० रिले स्पर्धा १४ वर्षे वयोगट यामध्ये सिद्धेश कोकणे, सार्थक तांदळे, शिवराज नाईकवाडे, सार्थक गोलेकर या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
मैदानावरील खेळामुळे विद्यार्थ्यांचे मन आणि मनगट मजबूत होते. यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून नियमित सराव करून घेतल्याचे क्रीडा शिक्षक आनंद वाघमारे व अंशकालीन निदेशक प्रशांत वायभट यांनी सांगितले. या स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून सराव करून विशेष परिश्रम घेतल्याबद्दल क्रीडा शिक्षकांचेही शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मजा हंम्पे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शिंदे, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिता गंगाखेडकर यांनी विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles