जिव्हाळा बेघर केंद्र हे बनले निराधाराचे एक कुटुंब
राजू वंजारे यांचे काम म्हणजे निस्वार्थ समाजकार्य – प्रेरित काझी
बीड : नव महाराष्ट्र न्यूज
माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त बीड येथील जिव्हाळा बेघर केंद्रामध्ये गरजू निराधार लोकांना अन्नदान व फळे वाटप करण्यात आले या निमित्ताने कॅनडा देशातील रहिवासी प्रेरित काझी (आर्किटेक्ट )हे उपस्थित होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून त्यांच्या समवेत मुंबई येथील भीम आर्मीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सुनील गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲड. राहुल मस्के, शशांक सोनवणे (पुणे), विजय गायकवाड, आदींच्या उपस्थितीमध्ये या गरजू, बेघर, निराधार लोकांना अन्नदान व फळे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी बोलताना प्रेरित काझी म्हणाले की, आपले हे काम अत्यंत मोलाचे आहे. आपल्या कामास आम्ही केव्हाही मदत करण्यास तयार आहेत निराधार लोकांचा आधार बनने ही फार मोठी गोष्ट आहे. यावेळी भीम आर्मी महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सुनील गायकवाड म्हणाले की आपण या लोकांना आधार दिला आणि केव्हाही आपल्या या निराधार केंद्रास मदत करू.
निराधार लोकांना आधार देण्याचे काम राजू वंजारे यांच्या माध्यमातून होत आहे हे आम्हाला अभिमानास्पद वाटते. सामाजिक काम करत असताना निस्वार्थीपणे आपण हे काम करत आहात याची समाजाणे जाणीव ठेवली पाहिजे आणि आपणास वेळोवेळी मदत केली पाहिजे अशी भावना व्यक्त केली याप्रसंगी ॲड. राहुल मस्के यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सामाजिक कार्यकर्ते अशोकराव शेजवळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम माझी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -