Monday, March 2, 2026
spot_img

डॉ. योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाचा राजीनामा

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या पक्षाने बीड नगरपालिकेची सर्व सूत्रे ‘शिवछत्र’ कडे दिल्याने नाराज झालेल्या डॉ. योगेश शिरसागर यांनी आपल्याकडे असलेल्या बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पाठवला आहे. त्यामध्ये ते असे म्हणाले की, वेळोवेळी स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला जाणीवपुर्वक डावलले जात असल्यामुळे मी पक्षातील वरिष्ठ नेत्याच्या कानावर ही बाब अनेक वेळा घातलेली आहे. परंतु यामध्ये कोणताही बदल झालेला दिसला नाही त्यामुळे मी माझ्या बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहेत. तरी पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारीच्या माध्यमातुन मी पक्षाची विचारधारा तळागळातील कार्यकर्त्यापर्यंत निष्ठेने व प्रामाणिक पणे पोहचवण्याचा प्रयत्न केला. पक्षाने टाकलेल्या विश्वासाबदल त्यांनी सर्व वरिष्ठ नेतेमंडळीचे आभार मानले आहेत.

डॉ. योगेश क्षीरसागर यांनी विधानसभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या पक्षात प्रवेश करून बीड विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना 93 हजारा पेक्षा जास्त मते घेतली होती त्यांचा अल्पशा मताने विधानसभेला पराभव झाला होता. विधानसभेच्या वेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला होता. जर त्यांची उमेदवारी लवकर जाहीर झाली असती तर कदाचित ते विजयापर्यंत पोहोचू शकले असते अशी बीड विधानसभा मतदारसंघात पराभवानंतर चर्चा सुरू होती.

डॉ. योगेश शिरसागर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांच्या माजी खासदार केशर काकू क्षीरसागर, चुलते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि वडील माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा फोटो टाकून ‘ विकास हीच जात, विकास हाच धर्म, हा संदेश लिहिलेला आहे. आता डॉ. योगेश क्षीरसागर हे नेमका काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles