डॉ. योगेश क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश
बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का
बीड : नव महाराष्ट्र न्यूज
बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील गटबाजीला वैतागून बीड विधानसभा प्रमुख डॉ. योगेश क्षीरसागर यांनी काल पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत डॉ. योगेश शिरसागर, सारिका क्षीरसागर यांनी प्रमुख समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे.
आज सकाळी (दि. 16 नोव्हेंबर) रविवार रोजी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचा राजीनामा देण्यामागील कारण सांगितली. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला असून डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांची बीड शहरासह बीड विधानसभा मतदारसंघात चांगली बांधणी असून त्यांच्या प्रवेशाने बीड शहरात आणि मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी घोषित होऊनही त्यांनी 93 हजार पेक्षा जास्त मतं घेतली होती. त्यांचा विधानसभा निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी विधानसभेला पराभव झाला होता. त्यांच्या प्रवेशाने बीड विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणित बदलली आहेत.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे लक्ष :
बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांची आजही वेगळी ताकद असून ते गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही पक्षात नाहीत बीड विधानसभेच्या वेळी त्यांनी पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला होता. सध्या जयदत्त क्षीरसागर भाजपात प्रवेश करतात की वेगळा निर्णय घेतात याकडे बीड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -