दिल्लीतील राष्ट्रीय कविसंमेलनासाठी डॉ. दासू वैद्य यांची निवड
छत्रपती संभाजीनगर : नव महाराष्ट्र न्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दासू वैद्य सरांची नवी दिल्ली इथे पुढील वर्षी २३ जानेवारी रोजी होणाऱ्या सर्व भाषा राष्ट्रीय कवी संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. वैद्य यांना दिल्लीमध्ये कवितेसाठी महाराष्ट्रातून प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान मिळाला असून, मराठी भाषेतील नामवंत कवी म्हणून त्यांची निवड झाली आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असलेले सर्व भाषा कवी संमेलन दरवर्षी आकाशवाणीकडून आयोजित करण्यात येतं. भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट- ८ मधील २२ अधिकृत भाषांतून प्रत्येकी एक कवी या कार्यक्रमात आपली कविता सादर करतो. यावर्षी मराठी भाषेसाठी छत्रपती संभाजीनगरचे कवी दासू वैद्य यांची राज्य समितीकडून निवड करण्यात आली आहे, असे आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी सुजीत बनसोडे यांनी कळवले आहे.
डॉ. दासू वैद्य यांचे तूर्तास , तत्पूर्वी आणि तथापि हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी भेट, सावरखेड एक गाव, गाभरीचा पाऊस, आजचा दिवस माझा, तुकाराम यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. मराठी टीव्ही मालिकांसाठी लेखन, एकांकिका, बालकविता, ललित निबंध यांसारखे अनेक साहित्यप्रकार त्यांनी लीलया हाताळले आहेत.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -