धनंजय मुंडे उद्या गहिनीनाथगडावर ; धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार संत वामनभाऊंच्या समाधीची महापूजा
संत वामनभाऊंच्या पुण्यतिथीचा सुवर्णमहोत्सव; धनंजय मुंडेंच्या हस्ते महापूजेचे 25 वे वर्ष
बीड : नव महाराष्ट्र न्यूज
वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळा पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे उद्या संपन्न होत असून, प्रति वर्षीच्या परंपरेनुसार याही वर्षी पुण्यतिथी सोहळ्याच्या प्रमुख महापुजेचा मान माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना आहे. या निमित्त धनंजय मुंडे हे श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते संत वामनभाऊ यांच्या समाधीची महापूजा सकाळी संपन्न होणार आहे.
संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापूजा करण्याच्या परंपरेला देखील या वर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत, हा योगायोग जुळून आला आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -