नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी रविवारी सुद्धा ऑफलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारणार
मुंबई : नव महाराष्ट्र न्यूज
महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने (दि. १६ नोव्होंबर) रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील स्वीकारली जातील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. १६) देखील सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक इच्छूक उमेदवारांनी रविवारीच नामनिर्देशनपत्रे दाखल केल्यास अखेरच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल, असेही राज्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -