- बीड, दि ०३ (प्रतिनिधी) :
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या स्वर्गीय डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण आणि बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या चुकीमुळे बीड तालुक्यातील आंबील वडगाव येथील स्वर्गीय छाया पांचाळ मृत्यू प्रकरणी शिवशक्ती भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी नेकनूर येथे ०२ ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी एक वाजता निषेध बैठक आयोजित केली होती. यावेळी दोन्ही भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या निषेध बैठकीत शिवशक्ती भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील असे म्हणाले की, स्वर्गीय डॉ. संपदा मुंडे प्रकरणी एसआयटी दाखल करून सखोल तपास करावा आणि आरोपींना कठोर शासन करावे. तसेच सदरील प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी डॉ. संपदा मुंडे यांच्यावर होणारी चिखल फेक थांबवावी अन्यथा चिखल फेक करणाऱ्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तसेच छाया पांचाळ यांच्या मृत्यू प्रकरणी बीड जिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व नर्स यांच्यावर कठोर कारवाई करून दोन्ही भगिनींना न्याय मिळवून द्यावा. जोपर्यंत दोन्ही भगिनींना न्याय मिळत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात आंदोलन उभा करून मी हा लढा सर्वांना सोबत घेऊन लढणार आहे. तसेच यावेळी ऍड. जगदीश शिंदे, सतीश पायाळ ( जिल्हाध्यक्ष भीमशक्ती बीड ), सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदा पांचाळ, आम्रपाली साबळे, सादेक सय्यद (शहराध्यक्ष आप बीड), अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष आप बीड) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी यावेळी दोन्ही भगिनींना न्याय मिळावा. आरोपींना कठोर शासन व्हावे तसेच फलटण येथे पत्रकार परिषद घेऊन आरोपीची बाजू घेणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी करावी. आणि आरोपींना क्लीन चीट देणाऱ्या मुख्यमंत्र्याचा निषेध केला.
या ठिकाणी दोन्ही भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष आप बीड), किस्किंदा पांचाळ( सामाजिक कार्यकर्त्या बीड), ऍड. जगदीश शिंदे, आम्रपाली साबळे (सामाजिक कार्यकर्त्या बीड), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आप बीड), सतीश पायाळ ( जिल्हाध्यक्ष भीमशक्ती बीड ), रायचंद कापसे (शिवसंग्राम नेते नेकनुर सर्कल), गेवराई येथील सामाजिक कार्यकर्त्या शाहीन पठाण, चंद्रकला बावचकर, गोरक्षनाथ कदम (शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख बीड), विलास किलमिसे (सरपंच अंबिलवडगाव), शिलावती पांचाळ, जगन्नाथ घोडके, बाबुराव कदम, गणेश पांचाळ, कैलास खराडे, शशिकांत आंधळे, विनोद जगताप, भारत साळवे, कल्याण घोरपडे, सोमनाथ पांचाळ, रोशन पायाळ, रमेश खराडे, दिनकर तांदळे, आश्रुबा मुंडे, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



