न प रणधुमाळी : विरोधकांना धडा शिकवा — अमरसिंह पंडित
गेवराई – दहा वर्षे सत्ता असतानाही विरोधकांनी अतिक्रमण धारकांना हक्काचा पीटीआर दिला नाही, विजयसिंह पंडित आमदार झाल्यानंतर दहा महिन्यांत पीटीआर देण्याचे काम आम्ही केले. हक्काचा माणूस म्हणून अडीअडचणीत नागरीकांना उपलब्ध होणाऱ्या महेश दाभाडे यांच्या रुपाने सौ.शितलताई महेश दाभाडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देत आहे. त्यांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करून सत्तेच्या लालसेने एकत्र आलेल्यांना धडा शिकवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले. विठ्ठल पवार यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात अमरसिंह पंडित यांनी सौ.शितलताई दाभाडे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली.
गेवराई नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माजी आमदार अमरसिंह पंडित कोणाला उमेदवारी देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांनी माजी आमदार लक्ष्मण पवार आणि त्रिंबक पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. जे स्वतःच्या बहिणीचे झाले नाहीत ते गेवराईकरांचे काय होतील ? असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले की, मुस्लिम समाजासाठी आ. विजयसिंह पंडित यांनी दहा महिन्यांत दोन कोटी रुपये किंमतीचा भव्य शादीखाना मंजुर केला, दहा वर्षे यांच्या पाठिशी मुस्लिम समाज राहिला परंतु त्यांनी समाजाला काही दिले नाही, दहा वर्षांत त्यांना बसस्टँड समोरील नाली करता आली नाही ते शहराचा विकास काय करतील? असा सवालही महेश दाभाडे यांनी यावेळी केला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -