Monday, March 2, 2026
spot_img

बीडच्या फटाका बाजारात मंदीचे सावट

फटाका मार्केटमध्ये उभारले 50 स्टॉल, गतवर्षीच्या तुलनेत 10 टक्क्याने वाढले फटाक्याचे भाव

बीड: यंदा फटाका बाजारात मंदीचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले होते. त्याचा फटका दिवाळी बाजाराला बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड शहरातील अमरधाम समोरील मैदानावर फटाका असोसिएशनच्या वतीने प्रशासनाने दिलेल्या जागेत स्टॉल उभारण्यात आले आहेत.

फटाका व्यापाऱ्यांसाठी असोसिएशनने उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अग्निशमन यंत्र ,सुरक्षारक्षक पाण्याचे टँकर तसेच आपत्कालीन व्यवस्था असोसिएशनच्या वतीने उभारण्यात आलेली आहे. मागील पंचवीस तीस वर्षापासून असोसिएशनच्या उत्कृष्ट नियोजनामुळे एकही अनुचित प्रकार घडलेला नाही यंदा देखील उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे. एकंदरीत अशी सगळी व्यवस्था असली तरी यावर्षी मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी अडचणीत आहे अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील ग्राहक फटाका खरेदीसाठी म्हणावा त्या प्रमाणात बीड शहरात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी दिवसभर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक घराबाहेर पडतील अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

चौकट….

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी दक्ष:
फटाका असोसिएशनच्या वतीने फटाका मार्केटमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना कुठलाही त्रास होऊ नये किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी असोसिएशनने विशेष लक्ष दिले आहे. यामध्ये ठिक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे ग्राहकांना मुक्तपणे फटाक्याची खरेदी करता येते.

अनुचित प्रकार रोखण्याची आवश्यक:

बीड शहरातील रहदारीच्या मार्गावर अनेक फटाक्यांची अनाधिकृत दुकाने थाटले गेलेले आहेत ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे त्या ठिकाणी फटाक्यांची दुकाने उभारणे धोकादायक आहे प्रशासनाने दिलेल्या जागेवर असोसिएशनच्या वतीने 50 स्टॉल उभारण्यात आलेले आहेत या ठिकाणी आलेल्या व्यापाऱ्यांची असोसिएशनच्या वतीने विशेष व्यवस्था केली जाते परंतु काही लोक लोकवस्तीच्या आजूबाजूलाच फटाक्यांची दुकाने थाटत असल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो या सगळ्या प्रकाराकडे पोलिसांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे व त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. असे फटाका असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles