Monday, March 2, 2026
spot_img

बीडमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म समकालीन आकलनावर धम्म चर्चा

बीड: समाज परिवर्तनाचे अधिष्ठान असलेल्या सम्यक बुद्धांच्या शिकवणीचा आधुनिक संदर्भातून आढावा घेण्यासाठी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म : समकालीन आकलन’ या विषयावर भव्य धम्म चर्चा आयोजित करण्यात आली आहे. ही चर्चा रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, हॉटेल निलकमल, बीड येथे पार पडणार आहे.

या धम्म चर्चेत डॉ. प्रकाश सिरसट आणि डॉ. उमेश बागडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी डॉ. विक्रम धन्वे राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. राजेश शिंदे करतील, तर सूत्रसंचालन सुनिल डोंगरे करणार आहेत. फुले-आंबेडकर विचार सभेचे संयोजक वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, डॉ. बी. एन. जावळे आणि अॅड. तेजस वडमारे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की “या अर्थपूर्ण व चिंतनपर धम्म चर्चेत सहभागी होऊन समाज परिवर्तनाच्या विचारप्रवाहाला बळ द्यावे”

धम्म चर्चेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमंत्रक रजनिकांत वाघमारे, प्रविण टाकणखार, युवराज जाधव, मल्हारी जाधव, सूरज निकाळजे, सुशीलकुमार उजगरे, संदिप सोनवणे, विक्रांत उजगरे, धनराज पारवे, आशिष जोगदंड, आकाश कोकाटे, चंदू काळे, वैभव धवन, मयूर कांबळे, प्रताप बनसोडे, अनिकेत वडमारे, सूरज वाघमारे, आदर्श सोनवणे, अमित कोरडे, अभय इंगोले, ऋषी उघडे, सारंग जावळे, मनोज शिंदे, सिध्दार्थ पवळे परिश्रम घेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles