बीड : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ देण्यास शासनाने मंजुरी दिली असून, या उपक्रमात बीड तालुक्यातील ४० अंगणवाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अंगणवाड्या स्मार्ट करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत महिला व बालविकास विभागाने बीड तालुक्यातील ४० अंगणवाड्यांना स्मार्ट किट खरेदीस मंजुरी दिली आहे. या योजनेत रायमोह १, हटकरवाडी, आवळवाडी, दगडवाडी, लिंबा, पौंडूळ, धनगरवाडी, रायमोह २, रायमोह ३, वरखेड २, मुळकवाडी, मसेवाडी, हिवरा पहाडी १, खांडे पारगाव २, लिंबा रुई २, मोरगाव २, सांगळवाडी दत्तनगर, खालापुरी १, बीडमधील इंद्रप्रस्थ कॉलनी, अंकुश नगर नरसोबा नगर, कागदीवेस, पंचशील नगर, शाहूनगर हनुमान नगर, अजीजपुरा, हिंगणी हवेली, म्हाळसजवळा क्र.२, म्हाळसजवळा अंतर्गत खाडे वस्ती, पिंपळनेर १, पिंपळनेर अंतर्गत बाभळवाडी, सिद्धेश्वर नगर, कुर्ला, दगडी शहाजनपुर, चांदेगाव, महाजनवाडी, कारेगव्हाण, चांदसवाडी, ससेवाडी, दवरवाडी, पिंपळगाव मोची या अंगणवाड्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे लहान बालकांच्या शिक्षण व संगोपनासाठी अधिक चांगले व आधुनिक वातावरण उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाबद्दल डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे आभार मानले असून, “या निर्णयामुळे बालविकासाचा दर्जा उंचावेल,” असेही ते म्हणाले.
आदर्श अंगणवाडीमध्ये रुपांतरण करणार
स्मार्ट अंगणवाडी किटची किंमत १ लाख ६४ हजार ५४० रुपये असून खाजगी पुरवठादारामार्फत साहित्याचा पुरवठा व अंगणवाडीचे आदर्श अंगणवाडीमध्ये रुपांतरण करण्याचे कामकाज अंगणवाडी स्तरावर करण्यात यावे, यासाठी महिला व बालविकास विभागाने मान्यता दिली आहे.



