बीड शहराला बकाल बनविणाऱ्यांना धडा शिकविणार : अमरसिंह पंडित
बीड : नवमहाराष्ट्र न्यूज
मागील तीस वर्षात बीड शहराच्या विकासाची वाट लागली आहे. नागरीकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. चांगले रस्ते नाहीत. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. आजवर सत्तेत असलेल्यांनी बीड शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. शहराला बकाल बनविणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व मित्र पक्ष धडा शिकविल्या शिवाय रहाणार नाही. असे मत राकॉ चे जेष्ठ नेते माजी आ. अमरसिंह पंडित यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
बीड नगर पालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांची उमेदवारी जाहीर केल्या नंतर माजी आ. अमरसिंह पंडित आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, शिवसंग्रामचे कोलंगडे, सुहास पाटील आदींची उपस्थिती होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी ला ऐनवेळी योगश क्षीरसागर यांनी ऐनवेळी धक्का देत भाजप मध्ये प्रवेश केला. यानंतर केवळ दोन ते तीन दिवसातच शहरातील ५२ ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार जाहीर करण्यात आले. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना पंडित म्हणाले की, बीडचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. त्यांनी स्वत: बीड शहराच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. बीड शहराच्या विकासाची वाट लावणाऱ्यांना इथली जनता कधीही माफ करणार नाही असा टोला क्षीरसागरांचे नाव न घेता माजी आ. अमरसिंह पंडित यांनी लगावला.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -