Monday, March 2, 2026
spot_img

संपदा मुंडे हत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी रिपाइंची मागणी

बीड: सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने पूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली असून या प्रकरणातील पी आय गोपाळ बदने व प्रशांत बनकरला अटक करण्यात आली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची कवडगाव येथे सोमवार दि.27 ऑक्टोबर रोजी भेट देऊन केली.

 

फलटण जिल्हा सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांना आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत असणारे पीआय गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांच्यासह फलटण पोलीस विभागातील सुनील महाडिक डीवायएसपी, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक पाटील, उपनिरीक्षक जायपत्रे व वैद्यकीय अधिकारी अंशुमन धुमाळ, उपजिल्हा रुग्णालय फलटण यांना संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी सहआरोपी करण्यात यावे. अशी मागणी रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी कुटुंबीयांच्या भेटी प्रसंगी केली.

 

डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचे काम फलटण येथील पोलीस विभाग व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपाइंचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती पप्पू कागदे यांनी दिली. या घटनेचा रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

 

 

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles