Monday, March 2, 2026
spot_img

माता व बालसंगोपन इमारतीसाठी लिफ्ट व फर्निचरचा निधी देण्याची मागणी

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांना निवेदन – डॉ. गणेश ढवळे

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्हा रुग्णालय परिसरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत तब्बल २१ कोटी रुपये खर्चून उभारलेली १०० खाटांची माता व बालसंगोपन इमारत निधीअभावी आजही कार्यान्वित न झाल्याने धुळखात पडली आहे. लिफ्ट आणि फर्निचरच्या निधीअभावी इमारतीचा वापर सुरू होऊ शकलेला नाही.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत अपुरी पडत असून, त्याच इमारतीत सोनोग्राफी व एक्स-रे विभाग कार्यरत आहेत. दररोज सुमारे ४०० हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात, मात्र व्हरांड्यात केवळ १५ ते २० रुग्णांसाठीच बसण्याची सोय असल्याने गर्भवती महिलांना ताटकळत उभे राहावे लागते. आयपीडी विभागातही गर्दी वाढल्याने उपचारात अडचणी निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर डॉ. गणेश ढवळे (मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य), शेख युनुस च-हाटकर आणि शेख मुबीन यांनी आज (दि.१०) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांच्यामार्फत पालकमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनात नियोजन समितीकडून लिफ्ट व फर्निचरसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

१०० खाटांच्या माता व बालसंगोपन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून लिफ्ट व फर्निचरच्या उर्वरित कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे.इमारतीमध्ये एकूण ४ लिफ्ट असून त्यापैकी ३ लिफ्टचे काम पूर्ण झाले आहे. निधी मिळताच उर्वरित लिफ्ट व फर्निचरचे काम पूर्ण करून इमारत कार्यान्वित केली जाईल असे डॉ. संजय राऊत यांनी सांगितले.

“अजितदादा के नाम पे दे दो बाबा” आंदोलन आचारसंहितेमुळे स्थगित :

पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेसह जिल्हा रुग्णालय आवारात आज “अजितदादा के नाम पे दे दो बाबा” हे लक्ष्यवेधी भिक मांगो आंदोलन होणार होते. मात्र, नगरपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles