बीड (प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील चौसाळा येथील गोरे इंग्लिश स्कूल या शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी राधिका महेश पवार ही मुलगी शाळा सुटल्यानंतर शाळेच्या बसने आपल्या घराकडे जात असताना आठ नोव्हेंबर शनिवार रोजी चार वाजून दहा मिनिटाच्या दरम्यान सदरील बस चौसाळा – मोंढा रोडवर डॉ. पोथरकर यांच्या जुन्या दवाखान्यासमोर थांबलेली होती. बस थांबल्यानंतर त्यामधून मुलगी उतरली व आपल्या घराकडे रस्ता क्रॉस करत असताना स्कूल बसच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकी स्वराने सदरील मुलीला धडक दिली त्यावेळी सदरील मुलीच्या अंगावर दुचाकी पडल्याने त्यामध्ये मुलगी जखमी झाली असून त्यावेळी आसपासच्या काही तरुणांनी रस्त्यावर मुलीच्या अंगावर पडलेल्या मोटर सायकलला उचलून बाजूला केले. आणि मुलीला उचलले. सदरील मुलीच्या पाठीवर शाळेचे दप्तर असल्याने सदरील मुलीला दुचाकीने धडक दिल्यानंतर ती त्या दप्तरावर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु तिच्या डोक्याला व हाताला मार लागलेला आहे. त्यावेळी सदरील दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला.

गतिरोधक बसवण्याची गरज : सदरील रस्त्यावर यापूर्वीही एका युवकाला भरधाव आलेल्या दुचाकीने धडक दिल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदरील रस्ता हा कायम रहदारीचा असल्याने या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असल्याने या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित घटनेची तात्काळ दखल घेऊन सदरील रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसून घ्यावेत. मागणी चौसाळा येथील ज्येष्ठ पत्रकार एन टी वाघमारे यांनी केली आहे.



