Monday, March 2, 2026
spot_img

राज्यस्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेत नयन बारगजे ने पटकावले १० वे सुवर्णपदक

हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ गट तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

लातूर येथे पार पडलेल्या 35 व्या महाराष्ट्र राज्य सिनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धेत कु. नयन अविनाश बारगजे हीने पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळवून हैदराबाद ( तेलंगणा ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात स्थान मिळविले आहे, अशी माहिती तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र (मुंबई ) संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली.

तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या मान्यतेने लातूर जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 5 ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या 35 व्या महाराष्ट्र राज्य सिनियर क्योरोगी व पुमसे तायक्वांदो स्पर्धेत पुणे, ठाणे, जळगाव, रायगड, रत्नागिरी व बीड जिल्ह्यातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. जवळपास 28 जिल्ह्यातील 320 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले. बीड जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. नयन अविनाश बारगजे हिने ४९ वजन गटात अंतिम फेरीत धडक मारत पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले. तीचे राज्यस्तरावर हे 10 वे सुवर्णपदक व अजिंक्यपद आहे. हैदराबाद (तेलंगणा) येथे दिनांक 12 ते 15 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 41 वी राष्ट्रीय सिनियर क्योरोगी व पुमसे तायक्वांदो स्पर्धेसाठी तीची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

नयन बारगजे हिने आजवर राज्यस्तरीय स्पर्धेत 10 वेळा सुवर्णपदक पटकावून देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून 10 वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा , शालेय स्पर्धा, फेडरेशन, ओपन स्पर्धा व अखील भारतीय विद्यापीठाच्या राष्ट्रीय पातळीवरील तायक्वांदो स्पर्धेत अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके जिंकली आहेत. डॉ अविनाश बारगजे सर व जया बारगजे यांची कन्या असून प्रविण सोनकुल यांचे तीला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शन लाभत आहे. लातूर येथे पार पडलेल्या राज्य स्पर्धेत बीड जिल्ह्याचा राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू ओंकार परदेशी याने रौप्यपदक तर देवेंद्र जोशी याने कांस्यपदक पटकावले आहे. ऋत्विक तांदळे, सुमित राऊत , सागर केळगंद्रे व प्रतिक कांबळे यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.

लातूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेत क्योरोगी प्रकारात कु. निकीता पवार (जळगाव) व कानिफनाथ पोकळे (पुणे) यांना तर पूमसे प्रकारात वंश ठाकूर व मृणाली हर्नेकर (ठाणे) यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर, नितीनचंद्र कोटेचा, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, दिनकर चौरे, जया बारगजे, भारत पांचाळ, बन्सी राऊत, मनेश बनकर यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी नयन बारगजे हिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles