राज्यस्तरीय स्पर्धेत रमेश जाडकर राज्यातून द्वितीय
चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज
शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी व शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी, शिक्षकांचा व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याची ओळख निर्माण करून देण्यासाठी यावर्षीपासून राज्यातील शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे यांनी एकूण ४३ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन या वर्षात केलेले आहे. यातीलच राज्यस्तरीय ॲनिमेशन सादरीकरण स्पर्धा दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण पदमपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. राज्यातून प्रत्येक विभागातून आलेले स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) ता. बीडच्या कानडीघाट हायस्कूल, कानडीघाट ता. जि. बीड या शाळेचे गणित विषय शिक्षक रमेश जाडकर सर यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातील विविध जिल्ह्यातून स्पर्धक मोठ्या संख्येने आलेले होते. या स्पर्धेत नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) जिल्हा बीडच्या कानडी घाट हायस्कूल, कानडी घाट ता. जि. बीड या शाळेचे गणित विषय शिक्षक रमेश जाडकर यांच्या कामगिरी करिता नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. दिपाताई क्षीरसागर, तसेच संस्थेचे प्रशासक डॉ. व्हि. टी. देशमाने व डॉ. श्री गुट्टे तसेच कानडीघाट हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एन. कसबे, चौसाळा बीटच्या जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती प्रणिता गंगाखेडकर, चौसाळा केंद्राचे केंद्रप्रमुख तुकाराम सपाटे, तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी तसेच मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -