Monday, March 2, 2026
spot_img

लंपी स्किन मुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना सरकारने आर्थिक मदत करावी – बाळासाहेब मोरे पाटील

बीड जिल्ह्यात ५८ पेक्षा जास्त जनावरांचा लंपी स्किनने मृत्यू

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

लंपी स्किन मुळे बीड जिल्ह्यातील ५८ पेक्षा जास्त जनावरांचा आतापर्यंत मृत्यू झालेला असून सध्या बीड जिल्ह्यात ६३४ जनावरे उपचार घेत असून आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त जनावरांना लंपी स्कीनची लागण झालेली आहे. सदरील रोगामुळे मृत्यू होणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना यापूर्वी आर्थिक मदत सरकारकडून करण्यात येत होती. परंतु सरकारने ती मदत साथ आटोक्यात आल्याच्या निष्कर्षातून बंद केलेली आहे. सदरील बंद केलेली आर्थिक मदत पुन्हा सुरू करून त्यामध्ये वाढ करावी आणि मृत्यू होणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना प्रति जनावर ७० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी केली आहे.

लंपी स्किनची साथ सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असून एकट्या बीड जिल्ह्यात रेकॉर्डवर आलेली आकडेवारी वरील प्रमाणे असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या मृत्यू पावलेल्या व जनावरांना लंपी स्कीन या आजाराची लागण झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाच्या च्या यंत्रणेकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदरील प्रकरणाची पशुसंवर्धन विभागाच्या प्रशासनाने गंभीर दखल घेऊन सदरील आजारावर तात्काळ शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन लसीकरण करावे. आणि आवश्यक त्या ठिकाणी लंपी स्किनची लागण झालेल्या जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरू करावेत.

तसेच या गंभीर परिस्थितीत सरकारने बंद केलेली आर्थिक मदत पुन्हा सुरू करावी आणि मृत्यू पावलेल्या प्रत्येक जनावरासाठी किमान ७० हजार रुपयांची आर्थिक मदत जनावरांच्या पशुपालकांना करावी. जनावरांचा मृत्यू झाल्यापासून सदरील घटनेची सर्व प्रक्रिया करून पंधरा दिवसात सदरची मदत पशुसंवर्धन विभागाच्या प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी विनंती शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी केली आहे.

सदरील आजारामुळे महाराष्ट्रातील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे लंपी स्किन च्या आजाराने मृत्यू झालेल्या जनावराबाबत पशुसंवर्धन विभाग जर दखल घेत नसेल तर सदरील जनावराच्या मालकांनी ९२८४७०२०१२ या दूरध्वनी नंबर वर संपर्क करावा असे आवाहन शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles