लंबी स्कीनने हिंगणे खुर्द मध्ये बैलाचा मृत्यू
बीड : बीड तालुक्यातील हिंगणी (खुर्द) येथील चौरे वस्तीवर धनराज तुळशीराम चौरे यांच्या बैलाचा लंबी स्कीन च्या आजाराने आज सकाळी पहाटे सहाच्या दरम्यान मृत्यू झाला असून सदरील बैलावर गेल्या पंधरा दिवसापासून उपचार सुरू होते. अगोदरच अतिवृष्टीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यावर लंबी स्कीनचे आता दुहेरी संकट कोसळले आहे. सदरील बैलाचा मृत्यू हा रब्बीच्या ऐन पेरणीच्या वेळेला झाल्याने धनराज चौरे या शेतकऱ्यावर आता पेरणी कशी करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच बैलाचा मृत्यू झाल्यामुळे सदरील शेतकऱ्यावर काळी दिवाळी करण्याची वेळ आली आहे तरी सरकारने पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तात्काळ सदरील बैलाचे पोस्टमार्टम करून सदरील शेतकऱ्याला आर्थिक मदत सरकारच्या नियमानुसार करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -