Monday, March 2, 2026
spot_img

विद्युत कर्मचारी स. पतसंस्था मर्या. पाटोदा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

पाटोदा : नव महाराष्ट्र न्यूज

3 जानेवारी रोजी विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. पाटोदा यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व क्रांतिकारी कार्याची माहिती देऊन करण्यात आली. स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करत समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास सुनील वाघमारे, सतीश गोरे, वैभव नाईकनवरे, खंडू बोबडे, श्री चौरे, श्री नाईकवाडे, शेख तसेच आझाद पत्रकार गणेश शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंती निमित्त सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा, तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सलाम करत सामाजिक समतेसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles