Wednesday, March 4, 2026
spot_img

शेजारील जिल्ह्यातील तालुके झपाट्याने बदलत असताना पाटोदा शहर मात्र अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडतेय – गणेश शेवाळे

पाटोदा : नव महाराष्ट्र न्यूज

पाटोदा शहराचा विकास रखडलेला असून गेल्या अनेक वर्षांपासून आजही मूलभूत सुविधां अभावी पाटोदा शहरातील नागरिकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. पाटोदा तालुका व शहराचा विकास आजही अपेक्षेप्रमाणे झालेला दिसत नाही. शेजारील जिल्ह्यातील तालुके झपाट्याने बदलत असताना पाटोदा शहर मात्र अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

पाटोदा शहरातील चौक – चौकात महामानवांचे पुतळे, चौकांचे सुशोभीकरण अद्याप झालेले नाही. इतर शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली चौक सुशोभीकरण, सांस्कृतिक ओळख जपली जात असताना पाटोदा शहर या बाबतीत मागे असल्याचे स्पष्ट होते. पाटोदा बाजार पेठेजवळील मांजरा नदीकाठी सुसज्ज व सुरक्षित नदीघाटाची सुविधा आजही उपलब्ध नाही. त्यामुळे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था खराब असून खड्डे व धुळीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच सार्वजनिक ठिकाणी शौच्छालयाचा अभाव असून याबाबत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. पाटोदा शहरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी चालण्याचे ट्रॅक, खुली जिम यांसारख्या आरोग्यविषयक सुविधांचाही अभाव आहे. शहरात नळजोडण्या व पाणीपुरवठा योजना असतानाही नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी नियमितपणे मिळत नसल्याचे वास्तव आहे.

कोणालाही विरोध नसून केवळ आपल्या शहराचा विकास व्हावा, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र पाटोदा शहराचा विकास नेमका का थांबला आहे, असा सवाल सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पाटोदा तालुका व शहराच्या विकास प्रश्नांवर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने ठोस आणि जबाबदार भूमिका घ्यावी, अशी मागणी पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शेवाळे यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles