Monday, March 2, 2026
spot_img

सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेला खुनी हल्ला आ. सुरेश धस यांनीच घडून आणला ; राम खाडे यांच्या पत्नीचा आरोप

आरोपींच्या अटकेसाठी 29 डिसेंबरला तुलसा खाडे आंदोलन करणार

आष्टी : नव महाराष्ट्र न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आष्टी मतदारसंघाचे अध्यक्ष राम सूर्यभान खाडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात, आष्टीचे विद्यमान आमदार सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई आणि आरोपींच्या अटकेसाठी दि. 29 डिसेंबर 2025 पासून अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9:15 च्या सुमारास, कर्जत तालुक्यातील मांदळी येथील पाटील हॉटेल बाहेर राम खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर 10 ते 12 अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात राम खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुद्धीवर आल्यानंतर खाडे यांनी दिलेल्या जबाबात, आमदार सुरेश धस आणि प्राजक्ता धस यांनी सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याचा थेट आरोप केला आहे. राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी पोलीस प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मिरजगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे काही कर्मचारी आरोपींना पाठीशी घालत असल्याचे अर्जात म्हटले आहे. हल्ला होऊन 28 दिवस उलटले तरी अद्याप एकाही मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. उलट राम खाडे आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी तुळसा खाडे, त्यांचे कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते 29 डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

अर्जातील मुख्य आरोप खालीलप्रमाणे आहेत:
* पुरावे नष्ट करणे : घटनास्थळावरील शस्त्रांचे फिंगरप्रिंट्स, मिरची पूड आणि इतर पुरावे गोळा करण्याकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

* तपासामध्ये हलगर्जीपणा : तांत्रिक तपासाद्वारे (CDR आणि Dump Data) पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले असतानाही आर्थिक तडजोडीमुळे कारवाई थांबवण्यात आली.

* खोटा एफआयआर : जखमी साक्षीदारांची फिर्याद न घेता, मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी हॉटेल मालकाला बळजबरीने फिर्यादी बनवून तपासाची दिशा भरकटवण्यात आली.

* साक्षीदारांवर दबाव : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी सहकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles