Monday, March 2, 2026
spot_img

सेवारत सैनिक अविनाश वायभासे यांचे शाही इतमामात अंतिम संस्कार

बीड (प्रतिनिधी) : सेवारत सैनिक लांस नायक अविनाश आदिनाथ वायभसे राहणार पिंपरी (घाट), तालुका- आष्टी, जिल्हा – बीड येथील रहीवाशी असुन देशाची सेवा करीत असतांना उपचारा दरम्यान कमांड हॉस्पीटल पुणे येथे दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०१:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे राहते गावी पिंपरी (घाट) येथे दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी त्यांचा अंतिम संस्कार शाही इतमामात करण्यात आला.

यावेळी पोलीस खात्या तर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला तसेच प्रशासनातर्फे तहसीलदार आष्टी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पोलीस निरीक्षक अंभोरा पोलीस स्टेशन यांनी मानवंदना दिली.

श्री अविनाश वायभासे यांची सेनेतील सेवा 15 वर्ष झाली होती ते कमांड हॉस्पीटल पुणे येथे उपचारार्थ दाखल होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या परीवारात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी व आई वडील आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles