बीड : मित्र म्हटले की गप्पा आणि शाळेतील बालपणीचे मित्र म्हटले कि आठवणींना उजाळा. अशाच प्रकारे माजलगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तालखेड शाळेच्या 2003 च्या माजी विद्यार्थ्यांनी शुक्रवार (24) एकत्र येत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. तर विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकमेकांशी संवाद साधत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदरील कार्यक्रमाच्या अगोदर सर्व शिक्षिकांचे शाळेच्या मुख्य गेट पासून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेतील आठवणी नेहमीच हव्याहाव्याशा वाटतात. मात्र शिक्षणाचे पुरेसे धडे घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या कामधंद्यामध्ये व्यस्त होतो. नवनवीन मित्र-मैत्रिणी आयुष्यात येत असतात. मात्र शाळेतील मित्र आणि त्याच्या सोबतचे क्षण हे विसरता येत नाहीत. नेहमीच आपण आपल्या शाळेतील आठवणी एकमेकांशी शेअर करत असतो. अशाच शालेय मित्रांनी एकत्र येऊन, स्नेहसंमेलन साजरे करून आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची कल्पना किती सुंदर असते हे माजलगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तालखेड शाळेमध्ये पहायला मिळाले आहे. या शाळेने आम्हाला समाजामध्ये ठामपणे उभे राहण्याची प्रेरणादायी दिली असल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत मध्ये व्व्यक्त केली. तब्बल 22 वर्षानी एकत्र येत पुन्हा आपल्या शाळेमध्ये वर्गातील बकावर बसून, या विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव आणि जुन्या आठवणी व्यक्त करताना डोळ्यांच्या पापाण्या पाणावलेल्या पहायला मिळाल्या.आपल्या बालपणातील शाळेतील दिबस पुन्हा अनुभवायला मिळणे ही सर्वात मोठी आणि आनंदाची बाब आहे. असं म्हणतात कि बालपण गेलं कि पुन्हा मिळत नाही. मात्र आजच्या डिजिटल युगामुळे हे शक्य झाले आहे. सोशल मीडियाचा आधार घेत 22वर्षानी पुन्हा एकदा बालपण जगण्याची संधी आता प्रत्येकाला मिळत आहे.



