हिंगणी खुर्द येथील शिक्षक दयानंद तांदळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज
बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील रहिवासी असलेले शिक्षक दयानंद ज्ञानोबा तांदळे (वय : ५२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने २ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान निधन झाले आहे. ते नेकनूर जवळील सावंतवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हिंगणी खुर्द गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हिंगणी खुर्द येथील समशानभूमीत २ फेब्रुवारी सोमवार रोजी सायंकाळी ४:०० वाजता अंत्यविधी होणार आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -