Sunday, March 1, 2026
spot_img

हिंगणी (बु.) गायरान जमिनीमध्ये टोरेन्ट पॉवर पवनचक्की कंपनी कडुन अनाधिकृत पोल प्रकरणी महसूल प्रशासनाकडून स्थळ पंचनामा

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील हिंगणी (बु.) येथील गायरान जमिनीमध्ये टोरेन्ट पॉवर कंपनी कडुन अनाधिकृत पणे विनापरवानगी विधुत वाहिनी चे पोल उभे केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची दखल घेत महसूल प्रशासनाकडुन प्रत्यक्ष स्थळ पंचनामा करण्यात आला.

गायरान जमिनीचा कोणताही रितसर परवाना किंवा परवानगी न घेता टोरेन्ट पॉवर पवनचक्की कंपनीने अनाधिकृतपणे हे विधुत वाहिनी चे पोल उभे केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे. या तक्रारीची दखल घेत प्रशासकीय पथकाने घटनास्थळी भेट देवुन पाहणी करुन सदरील पोलचा स्थळ पंचनामा करण्यात आला या स्थळ पंचनाम्यावेळी चौसाळा मंडळ अधिकारी श्री जायभाय, ग्राम महसूल अधिकारी अश्विनी अनकर, सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर, चौसाळा ग्रामपंचायत सदस्य किशोर ढोकणे, अमोल शिंदे पाटील, अनिकेत हारे, डिंगाबर पवार उपस्थित होते. आता प्रशासकीय अहवालानंतर या टोरेन्ट पॉवर पवनचक्की कंपनी वरती कुठली कायदेशीर कारवाई केली जाते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles