Wednesday, February 25, 2026
spot_img

महावितरणच्या गलथान कारभारास चौसाळकर वैतागले

वीज परवठा सुरळीत होत नसल्याने चौसाळकरांची पाण्यासाठी भटकंती

चौसाळा : नवमहाराष्ट्र न्युज

चौसाळा हे बीड तालुक्यातील एक मोठे व महत्त्वाचे शहर असून या ठिकाणची लोकसंख्या जवळपास २० ते २५ हजार असून चौसाळा येथील महावितरण कार्यालयाच्या मार्फत येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेस वीज पुरवठा आहे. परंतु सध्या पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस आणि तळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असूनही महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे चौसाळकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारावर चौसाळा शहरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चौसाळा ही तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असून या ठिकाणी दिवसभर महावितरण कार्यालयाच्या आशीर्वादाने विजेचा लपंडाव कायम सुरू असल्याने येथील व्यापारी महावितरणच्या गलथान कारभारास पुरते वैतागले आहेत. ज्या व्यावसायिकांचे व्यवसाय हे विजेवर अवलंबून आहेत ते व्यावसायिक आपला व्यवसाय इतरत्र स्थलांतर करावा या विचारात आहेत. महावितरण कडून वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास येथील अनेक व्यवसाय इतरत्र स्थलांतर होऊ शकतात. तर अनेक व्यवसायावर यामुळे गंडांतर आले आहे. येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता महावितरण च्या वरिष्ठांनी सदरील प्रकरणी विशेष लक्ष घालून चौसाळा महावितरण कार्यालयाकडून सुरू असलेला लपंडाव थांबवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अशी मागणी येथील नागरिक, व्यापारी यांच्याकडून करण्यात येत आहे.

इंटरनेट सुविधेवर ही यामुळे परिणाम होत असल्याने अनेक वेळा शहरातील प्रमुख बँकांची नेट कनेक्टिव्हिटी हे यामुळे सतत खंडित होत आहे. इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने त्या कामासाठी ग्रामीण भागातून चौसाळा शहरात आलेल्या नागरिकांचा भरपूर वेळ यामध्ये वायाला जात असून आलेल्या दिवशी काम न झाल्यास पुन्हा – पुन्हा चौसाळा शहरात त्याच कामासाठी चक्रा माराव्या लागत आहेत. त्यामुळे महावितरणच्या या गलथान कारभाराला चौसाळा शहरासह सर्कलमधील अनेक गावचे नागरिक ही वैतागले आहेत.

चौसाळा महावितरण कार्यालयाचा हा भोंगळ कारभार तात्काळ थांबविण्यात यावा अन्यथा चौसाळा महावितरण कार्यालयाच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.

— विवेक कुचेकर (सामाजिक कार्यकर्ते, चौसाळा)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles