चौसाळा जिल्हा परिषद गटातून विजयराजे शिंदे यांनी निवडणूक लढवावी — जनतेची वाढती मागणी
चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज
चौसाळा जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयराजे शिंदे यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी जनतेतून होत आहे. चौसाळा शहरासह जिल्हा परिषद गटातून विजयराजे शिंदे यांचे नाव सर्कल मधील जनतेतून सर्वात पुढे येत आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे आणि लोकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासामुळे ते या गटासाठी सर्वाधिक योग्य उमेदवार तरुण चेहरा म्हणून पुढे येत आहेत अशी जनतेत चर्चा सुरू आहे.
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या चौसाळा ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी युवा क्रांती पॅनलच्या माध्यमातून सरपंच पदाची निवडणूक लढवत जोरदार लढत देत 1300 हून अधिक मते मिळवली होती. त्या वेळी चौसाळा शहरात तिरंगी सामना रंगला असला, तरी पराभवानंतरही विजयराजे शिंदे जनतेपासून दूर गेले नाहीत. उलट ते अधिक जोमाने लोकसेवेसाठी पुढे सरसावले.
मतदार संघातील राजकीय परिस्थितीनुसार त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला असून ते आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न, पिक विमा व कृषी विभागाशी संबंधित अडचणी यासह इतर कामासाठी कायम पाठपुरावा करतात, तसेच सर्कल मधील नागरिकांसाठी दवाखान्यासह इतर अडचणीच्या काळात कायम लोकांच्या मदतीला येतात. अशा विविध विषयांवर विजयराजे शिंदे कायम सक्रिय असतात. त्यांच्या या लोकाभिमुख कामांची जनतेत मोठी दखल घेतली जात असून, त्यामुळेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना संधी द्यावी, अशी जनतेतून मागणी वाढत चालली आहे.
जिल्हा परिषद गटातील नागरिक व कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की, “विजयराजे शिंदे हेच चौसाळा गटाच्या विकासाचे योग्य तरुण प्रतिनिधी ठरू शकतात.” त्यामुळे त्यांनी चौसाळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी सर्कलमधील नागरिकांसह कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -