Thursday, February 26, 2026
spot_img

मालेगाव चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी लिंबागणेश येथे तीव्र निदर्शने

आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे

बीड : नव महाराष्ट्र न्युज

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याच्या भीषण घटनने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे गुरुवार, दि. २० रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली.

निदर्शनाच्या सुरुवातीला स्व. यज्ञा दुसाने या चिमुरडीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी “आरोपींना फाशीच झाली पाहिजे”, “बलात्कार्यांना कायद्याची भीती निर्माण करा” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :

आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी

खटला जलदगती विशेष न्यायालयात चालवावा

सर्व सहआरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत

पीडित कुटुंबाला संरक्षण व आर्थिक मदत द्यावी

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली.

या निदर्शनात राजेभाऊ जाधव, बाळासाहेब, सरपंच बालासाहेब जाधव, पत्रकार हरिओम क्षीरसागर, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील मोरे, सर्पमित्र अशोक जाधव, विनायक वाणी, श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, अँड.गणेश वाणी, शिवाजी वाणी,दादा वाणी, शहादेव कोल्हे, रामकिसन गिरे, रुपचंद गव्हाणे, चोखोबा निर्मळ, अशोक दाभाडे, नरहरी ढवळे, अंकुश जाधव, विनायक मोरे , रफीक सय्यद, अकबर सय्यद, शहादेव ढास आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles