नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेला क्रूर बलात्कार आणि निर्दयी हत्या प्रकरणी दलित पँथरच्या वतीने स्वारगेट येथे रास्ता रोको आंदोलन दि. 20 नोव्हेंबर, गुरूवार रोजी दुपारी तीन वाजता स्वारगेट चौक येथे करण्यात आले. यावेळी सदरील घटनेतील आरोपीला फाशी देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आले.
तसेच या दहशत पसरवणाऱ्या अमानुष कृत्यावर दलित पँथरने प्रचंड आक्रोशातून जाहीर निषेध नोंदवला. “अशी पशुतुल्य कृत्ये करणाऱ्याला माणूस म्हणणंही अपराध आहे,” असा जाहीर हल्ला चढवत पँथर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निषेध नोंदवला. दलित पँथरच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको हे फक्त आंदोलन नव्हतं, तर हा संतापाचा ज्वालामुखी होता. अशा भावना पँथरचे कार्यकर्ते, नागरिक, तरुण, वृद्ध—सगळ्यांनी व्यक्त केल्या यावेळी एकच घोषणा केली,
“न्याय द्या! गुन्हेगाराला कठोर फाशी द्या!”
यावेळी प्रमुख उपस्थिती यशवंतभाऊ नडगम – राष्ट्रीय अध्यक्ष, दलित पँथर, पुणे शहर अध्यक्ष आकाश भाऊ पायाळ, पुणे शहर संपर्कप्रमुख विशाल भाऊ ओव्हाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भाऊ साळवे, सातारा जिल्हाध्यक्ष अमोलभाऊ पवार, संदीप क्षीरसागर, सचिन शिरसागर, गणेश आरने, आप्पा लांडगे, कुणाल साठे अजिंक्य मस्के अशा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते महिला आघाडी आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
यशवंतभाऊंचा टोकदार इशारा—
“या राक्षसी गुन्ह्याचा आरोपी ताबडतोब पकडला गेला पाहिजे. आणि एकदाच नाही — उदाहरण ठरेल अशी कठोर फाशी झाली पाहिजे!” सरकारलाही सवालाचा चाबूक फटकारत त्यांनी सांगितलं,
“अशा घटना थांबणार असतील तर सरकारने फक्त आश्वासनं नव्हे — कारवाई करून दाखवली पाहिजे!”
या वेळी स्वारगेटवर आंदोलन स्थळी आंदोलन कर्त्याकडून पुढील घोषणा देण्यात आल्या—
“चिमुकलीवरचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही!”
“न्याय मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही!”
स्वारगेट या ठिकाणी दलित पॅथरच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामुळे सर्व स्वारगेट परिसर ठप्प झाला होता.