अंबाजोगाईत पाच लाखांच्या गुटक्यासह इनोव्हा गाडी जप्त
बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड : नव महाराष्ट्र न्यूज
शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून गुटख्याने भरलेली ईनोव्हा क्रिस्टा कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली आहे. सदरील गाडीमध्ये 5 लाख 26 हजार 200 रूपयांचा गुटका व गाडी असा एकूण 25 लाख 26 हजार 200 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील घटनेत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीदाराने माहिती देवून बर्दापूर येथून अंबाजोगाईकडे गुटखा भरून एक पांढर्या रंगाची ईनोव्हा क्रिस्टा कार येत असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीवरून सेलुअंबा रोडवर असलेल्या टोल नाक्यावर पांढर्या रंगाची ईनोव्हा क्रिस्टा कार जिचा नंबर एम. एच. 14 जीयू 0699 असा होता तिला थांबविण्यात आले व चालकास माहिती विचारण्यात आली. चालक फारोख हमीद सय्यद (वय 45 रा. सय्यद गल्ली माजलगाव जि. बीड) याने माहिती दिली. यावेळी वाहनाची झडती घेतली असता 5 लाख 26 हजार 200 रूपयाचा गुटखा व इनोव्हा क्रिस्टा कार असा एकुण 25 लाख 26 हजार 200 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बेंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे/1429 केकान, 1837 गिते, पोना/1918 भताने व पोया 1055 अडके तसेच अंबाजोगाईचे सहाय्यक पोलिस अधीक्षक यांच्यासह संपूर्ण पथकाचा सहभाग होता.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -