Wednesday, February 25, 2026
spot_img

चौसाळा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी अभिवादन

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

6 डिसेंबर हा दिवस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणुन संपुर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने बीड तालुक्यातील चौसाळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध ठिकाणी अभिवादन करुन महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच अंकुश कळासे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर ढोकणे, विलास वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर, ग्रामपंचायत सदस्य कोंडिराम जोगदंड, दादाराव ढोकणे, लखन जोगदंड, इसाक सय्यद, ग्रामपंचायत लिपिक प्रदिप पवार उपस्थित होते.

यानंतर चौसाळा शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नामफलकाला उपसरपंच अंकुश कळासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच चौसाळा शहरातील भीम नगर येथिल बुध्दविहारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यास चौसाळा ग्रामपंचायतचे सदस्य किशोर ढोकणे व चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बापु चव्हाण, प्रभू मस्के, बबन पवार, तानाजी इंगळे, विनोद घोडके, रोहीत जावळे, साहील चव्हाण, विपुल चव्हाण, विकी सिरसाळे, लखन जोगदंड, दादाराव ढोकणे, पंकज रूपवते, सागर पवार, जितरत्न विवेक कुचेकर यांच्या सह महीला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या यावेळी बुध्द वंदना घेऊन अभिवादन सभेचा समारोप करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles