आ. संदीप क्षीरसागरांनी संधी दिल्यास चौसाळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार – नानासाहेब जोगदंड
चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज
चौसाळा परिसरातील अनुभवी, निष्ठावंत आणि जनसंपर्कात अग्रेसर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे शहराध्यक्ष नानासाहेब जोगदंड यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत चौसाळा गटातून उमेदवारीची तयारी असल्याचे सांगितले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी संधी दिल्यास चौसाळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नानासाहेब जोगदंड हे गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी निष्ठेने जोडलेले असून पक्षसंघटनात त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. चौसाळा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी ते २००७ पासून अखंडपणे सांभाळत आहेत. शहरविकास, नागरी सुविधा, सामाजिक प्रश्न, ग्रामविकास या सर्व क्षेत्रांत त्यांनी पुढाकार घेतल्याने त्यांची ओळख कार्यक्षम नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे.
राजकीय नेतृत्वाबरोबरच जोगदंड यांचा आडत दुकानाचा व्यवसाय असल्याने चौसाळा तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी त्यांचा घनिष्ठ संपर्क आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, बाजारभाव, तांत्रिक अडचणी याबाबत ते सतत संवाद साधत असल्याने त्यांचे व्यापक जनसंपर्क हे त्यांचे मुख्य बळ मानले जाते.
बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा त्यांचा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आमदार संदीप क्षीरसागर यांनी संधी दिल्यास पक्षाच्या धोरणांनुसार आणि मतदारांच्या आशा आकांक्षांनुसार काम करण्याची माझी पूर्ण तयारी आहे,” असे नानासाहेब जोगदंड म्हणाले.
चौसाळा व परिसरातील अनेक नागरिक, शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये जोगदंड यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. त्यांचा दीर्घ अनुभव, पक्षनिष्ठा व सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे ते जिल्हा परिषदेसाठी एक चांगला प्रभावी पर्याय ठरू शकतात, अशी मतदारांमध्ये चर्चा आहे. तसेच सद्यस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू असून उमेदवारांविषयीची चर्चा गती घेत आहे. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून घेतला जाणार असून नानासाहेब जोगदंड यांच्या नावाची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -