चौसाळा येथे ह.भ.प. धर्मराज महाराज सामनगावकर यांचे किर्तन
चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज
चौसाळा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रसेन गुंजाळ यांच्या मातोश्री स्वर्गीय चतुराबाई गुंजाळ यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्ताने सोमवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. धर्मराज दादा महाराज सामनगावकर यांच्या भव्य हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. धर्मराज दादा महाराज सामनगावकर यांचे हरिकीर्तन संपन्न होणार आहे. आपल्या प्रभावी वाणीतून समाजप्रबोधन, संतविचार आणि भक्तिरसाची अनुभूती देणारे धर्मराज दादा महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा आहे.
स्वर्गीय चतुराबाई गुंजाळ या धार्मिक वृत्तीच्या, समाजाभिमुख व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या हरिकीर्तनातून संतपरंपरेचा वारसा जपण्याचा आणि भक्तीभाव जागवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या वेळी अभंग, ओवी, हरिपाठ आणि संतविचारांचे सादरीकरण होणार असून श्रद्धा आणि भक्तीचे वातावरण निर्माण होणार आहे.
या हरिकीर्तन कार्यक्रमास परिसरातील सर्व भाविक, नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवाराने उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रसेन गुंजाळ, शहाजी गुंजाळ, शिवाजी गुंजाळ आणि गुंजाळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -