Thursday, February 26, 2026
spot_img

चौसाळा येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर रखडलेल्या पीक कर्जासाठी बाळासाहेब मोरे पाटील यांचे अमरण उपोषन

चौसाळा, ता. ३० (बातमीदार) :

Beed farmer news  चौसाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेमध्ये चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून खरीपाच्या पिकासाठी पीक कर्जाची मागणी केलेली आहे. परंतु सध्या खरिपाच्या पिकांची काढणी झाली तरी शेकडो शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळालेले नसल्याने शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील हे २९ ऑक्टोबर बुधवार रोजी अमरण उपोषणाला बसले होते.

शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी याबाबत १४ ऑक्टोबर रोजी जिल्हा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालय बीड, जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बँक बीड व शाखा अधिकारी भारतीय स्टेट बँक चौसाळा तालुका बीड जिल्हा बीड यांना २९ ऑक्टोंबर रोजी अमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन दिले होते.

यावर वरील निवेदनाची तात्काळ दखल घेऊन जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी यांनी चौसाळा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा अधिकारी यांना १५ ऑक्टोबर रोजी लेखी पत्र दिले होते. परंतु सदरील शाखा अधिकारी फनिकेश्वर कुंडा यांनी दखल न घेतल्याने बाळासाहेब मोरे पाटील हे चौसाळा येथील भारतीय स्टेट बँकेच्या समोर २९ ऑक्टोबर बुधवार रोजी उपोषणाला बसले होते.

यावेळी चौसाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी फनिकेश्वर कुंडा व फिल्ड ऑफिसर यांनी आंदोलन कर्ते बाळासाहेब मोरे पाटील यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. व उर्वरित कर्ज प्रस्ताव पंधरा दिवसात निकाली काढण्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर शिवशक्ती भीमशक्ती मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले असून पंधरा दिवसात बँकेत कर्ज प्रस्ताव दाखल केलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे पीक कर्ज वाटप न केल्यास पुन्हा बँकेच्या दारात अमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदरील आमरण उपोषणावेळी चौसाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार ) गटाचे सतीश भाऊ जोगदंड यांनी भेट दिली त्यांच्यासह परिसरातील शेतकरी पिंपळगाव घाटचे उपसरपंच संतोष तेलप, चंद्रकांत नाईकवाडे, प्रकाश गिरी, विशाल तेलप, सचिन तेलप, पांडुरंग आंधळे पाटील, सचिन शिंदे, अजिनाथ नाईकवाडे, बाळासाहेब सोनवणे, ज्ञानेश्वर नाईकवाडे पाटील, पंजाब नाईकवाडे, भीमराव शिंदे, व्यंकट चव्हाण, दत्तात्रय नागरगोजे आधी शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles