Thursday, February 26, 2026
spot_img

राज्यमार्ग चौसाळा – हिंगणी रस्त्यावरील साईड पंख्यावर रोवले विजेचे खांब

प्रवाशांच्या जीवितस धोका निर्माण

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

राज्यमार्ग क्रमांक ६४ वर चौसाळा ते हिंगणी च्या दरम्यान महावितरण विभागा मार्फत वीज वाहिनीचे खांब (पोल) उभारण्याचे काम सुरू आहे. सदरील कामामध्ये अनेक ठिकाणी वीज पोल रस्त्याच्या कडेला साईड पंख्यावर अवघ्या ३ ते ४ फुटांवर उभे केले गेले आहेत.

राज्यमार्ग हा दैनंदिन मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा मार्ग असून वाहतुकीची वर्दळही लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत रस्त्याला लागूनच उभारलेले वीज पोल हे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण करणारे असून त्यातून अपघाताचा धोका निर्माण झाला असून त्यामुळे प्रवाशांना पुढील परिणाम उद्भवू शकतात – वाहनांचे रस्त्यावरून सुटण्याची किंवा घसरून पोलला धडकण्याची शक्यता वाढते, दोन चाकी व चार चाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अपघाताचा धोका निर्माण होत आहे, रात्रीच्या वेळी दृश्यमर्यादा कमी असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढत आहे, महावितरणच्या नियमांनुसार मुख्य रस्त्यापासून सुरक्षित अंतर राखूनच वीज पोल उभारणी करणे बंधनकारक आहे. त्या संदर्भात नियमांचे पालन न झाल्याचे दिसून येते.

म्हणूनच महावितरण विभागाने व सदरील कंत्राटदार कंपनीने, सदरील बाबीची तात्काळ दखल घेऊन चौसाळा ते हिंगणी या मार्गावरील वीज पोलचे पुनर्मापन करून ते महावितरणच्या नियमांप्रमाणे रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर स्थानांतरित करण्यात यावेत. यामुळे अपघाताचा धोका टळेल व नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित होईल.

महावितरण कार्यालयाचे अभियंता यांनी संबंधित प्रकरणाचे तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी अन्यथा मी चौसाळा महावितरण कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करणार आहे.
ज्ञानेश्वर आंधळे (ग्रामस्थ, हिंगणी खुर्द)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles