चौसाळा येथील युवक प्रज्वल लगाडे बेपत्ता
बीड : नव महाराष्ट्र न्यूज
बीड तालुक्यातील चौसाळा येथील युवक प्रज्वल (बंटी) विलास लगाडे (वय : 18) हा रागाने घरातुन दिनांक 23 नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान निघुन गेला आहे. याबाबतीत त्याच्या नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेतला परंतु तो सापडला नाही. सदरील युवकाने त्याच्या इन्स्टाग्राम आयडी वरुन त्याच्या भावास दिनांक 24 नोव्हेंबर रोजी मेसेज करून असे कळवले आहे की, मी सुखरुप असुन मी पुणे याठिकाणी आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करु नका रागाच्या भरात सदरील युवक घरातुन निघुन गेलेला आहे. याबाबतीत नेकनूर पोलीस स्टेशन येथे याठिकाणी बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील विलास लगाडे यांनी दिली आहे. तसेच सदरील युवक कोणाला दिसल्यास नेकनुर पोलीस व त्याचे वडील विलास लगाडे मो. 9922252672 आणि त्याचा भाऊ रितेश लगाडे 9763123635 यांच्याशी संपर्क साधावा.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -