Monday, March 2, 2026
spot_img

साञा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

बीड तालुक्यातील चौसाळा येथून जवळ असलेल्या साञा येथिल शेतकरी नवनाथ हरिबा काळे (वय : 55) यांनी शेतातील सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळुन दिनांक 25 नोव्हेंबर मंगळवार रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान स्वतःच्या शेतात चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सदरील शेतकऱ्याला चार एकर कोरडवाहू जमीन आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी यामुळे शेतामध्ये नापिकी झाली. शेतामधून कुठलेच उत्पन्न न मिळाल्याने अगोदरच डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून शेतकरी नवनाथ हरिबा काळे यांनी आत्महत्या केली असल्याची माहीती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles