Monday, March 2, 2026
spot_img

बीड येथे पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटांचा गौरव

गट शेती प्रिमियर लीग 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी

बीड : नव महाराष्ट्र न्यूज

गट शेती प्रिमियर लीग 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष शेतकरी गटांचा भव्य सन्मान सोहळा आज बीड येथे उत्साहात पार पडला. सामूहिक पद्धतीने उत्कृष्ट शेती उपक्रम राबवल्याबद्दल एकूण २० गटांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिकारी मा. सुभाष साळवे, इन्फन्ट इंडिया चे संस्थापक अध्यक्ष मा. दत्ता बारगजे तसेच विभागीय समन्वयक मा. संतोष शिनगारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मा. जॉन्सन यांनी तालुक्यातील गटांनी सातत्याने केलेल्या कार्याचे कौतुक करताना म्हटले, “अतिवृष्टी व ओला दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांत नुकसान कमी करण्यासाठी गट शेती हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. जिल्हा प्रशासन पुढील काळात शेतकरी गटांना सर्वतोपरी मदत करेल.”

कृषी अधिकारी मा. सुभाष साळवे यांनी कृषी विभाग आणि संपूर्ण प्रशासन आगामी काळात पाणी फाउंडेशन व गट शेती उपक्रमांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

इन्फन्ट इंडिया चे अध्यक्ष मा. दत्ता बारगजे यांनी सिनेअभिनेता आमिर खान यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सुरू असलेली गट शेतीची चळवळ शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करीत असल्याचे सांगत सर्व शेतकरी गटांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास शेतकरी, महिलागट, पदाधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles